Home महाराष्ट्र …तरच भाजप-मनसे युती शक्य; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

…तरच भाजप-मनसे युती शक्य; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्याबाबत आपले विचार बदलणार नाही, तोपर्यंत मनसे-भाजप युती होऊच शकत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ते शनिवारी नाशिकमध्ये बोलत होते.

हे ही वाचा : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारणार; भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने फुंकलं रणशिंग

या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रगच्या व्यवसायात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने बहुमत दिले होते. मात्र, विश्वासघात करून अमर अकबर अँथनीचे सरकार सत्तेत झाले, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, या राज्यातली जनता सरकारवर नाराज असल्याने, 2024 मध्ये भाजप स्वबळावर लढून तिन्ही पक्षांना पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

 दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत पाटील

“अमरावतीतील वातावरण तापलं; सलग 4 दिवस संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद”

“शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”