ह्यांचं फक्त एकच काम, याला फोडा त्याला जोडा; अशोक चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका

0
250

नांदेड : देगलूर तालुक्यातील बिलोली येथे काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

ह्यांचा एकच कार्यक्रम आहे, ह्याला फोडा त्याला जोडा. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखे यांचे चालले आहे. त्यामुळे आता एकच काम करा यांना मारा हातोडा आणि गावाबाहेर काढा, असा घणाघात अशोक चव्हाणांनी यावेळी केला.

दरम्यान, यांना फक्त एवढं सांगा की, आमचे चांगले दिवस यायचे आहेत. कृपया आमच्या भागात येऊन नास करायचं काम करु नका, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच विरोधकांना तुम्ही असे सांगितले तर त्यांची या भागात फिरायची हिम्मतसुद्दा होणार नाही, असा हल्लाबोलही अशोक चव्हाणांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…; रामदास आठवलेंचा कविता स्टाईलमध्ये शरद पवारांना टोला

खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय; निलेश राणेंचा हल्लाबोल

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- खासदार अमोल कोल्हे

2024 नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here