“राम मंदीराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडे जाणार”

0
282

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जाणार, असं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

या मोहीमेत सर्वधर्मियांकडून निधी घेतला जाणार आहे?, असा सवाल विजय शंकर तिवारी यांना विचारला असता त्यावर ते म्हणाले, श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.

तसेच, इतर धर्मियांच्या घरी कार्यकर्ते फिरणार नाहीत. परंतू मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करणार, असं तिवारी यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि राहतील”

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल

“आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here