धनंजय मुंडेंनी बलात्कार आरोपाचं प्रकरण काय देऊन सेटल केलं, हे त्यांनाच ठाऊक- निलेश राणे

0
445

मुंबई : धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाचं प्रकरण काहीतरी देऊन सेटल केलं. त्यांनी यासाठी काय दिलं हे त्यांनाच ठाऊक, असं वक्तव्य भाजप नेते निलेश राणे  यांनी केलं आहे. ते गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, सरकार आणि पोलीस संजय राठोड यांना वाचवण्याचं काम करत आहेत. फोटो, ऑडिओ क्लीप आणि व्हीडिओ या गोष्टी आभाळातून बाहेर पडल्या आहेत का, असा सवाल करत पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही तर आम्ही चौकाचौकात आंदोलनं करु, असा इशाराही निलेश राणे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत”

“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत”

“मुख्यमंत्री महोदयांनी ‘ही’ घटना डोळ्यांसमोर आणावी, म्हणजे राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं सोपं होईल “

संजय राठोड यांची अडचण वाढण्याची शक्यता; पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here