एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

0
151

मुंबई : महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘एक शरद सगळे गारद’ असं टायटल संजय राऊतांनी दिलं आहे. यावरून भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसं नाहीत, असं दिसत आहे. पण किमान ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत, असंही नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ 3 मुद्द्यांवर चर्चा

एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का करा- संजय राऊत

सांगलीत राष्ट्रवादीच्या ‘या’ कार्यकर्त्याची हत्या

गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here