मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही राजेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी दोन्हीं राजेंवर टीका केली आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे., असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील; दानवेंच्या टीकेवर काॅंग्रेसचं प्रत्युत्तर
कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात
अमृता फडणवीसांचा नवा हटके लूक; ट्विट करत म्हणाल्या…