एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं; काँग्रेस नेत्याकडून जयंत पाटलांना खास शुभेच्छा

0
506

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. याचदरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करत जयंत पाटील यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा, असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबतचा एक फोटोही जोडला आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

“कोरोनापेक्षाही जास्त घातक भाजप”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here