Home महाराष्ट्र “एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का...

“एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का करा”

मुंबई : एक शरद बाकी गारद नावाने संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत प्रकाशित करणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार-राऊत यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवत राऊतांवर टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय  राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा, बेस पक्का करावा, त्यानंतर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.

“खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असं म्हटलं होतं, आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीत राष्ट्रवादीच्या ‘या’ कार्यकर्त्याची हत्या

गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे

मराठा समाजात एकी हवी; विजय आपलाच- छत्रपती संभाजीराजे

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह