“कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल”

0
175

कोल्हापूर : कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल, असं वक्तव्य कर्नाटकच्या महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी केलं आहे. महापूराचा आढावा घेण्यासाठी शिरोळ तालूक्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होते.

राजस्थानमध्ये  सध्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस सरकारवर टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातही  ऑपरेशन लोटस सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुन महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर शशिकला जोल्लेंनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, गेल्या 2 वर्षात कोल्हापूर महापूर स्थिती लक्षात घेतली असता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय नव्हता, मात्र सध्या दोन्ही राज्यात समन्वय आहे. गेल्यावर्षी महापूराचा फटका दोन्ही राज्यातील जनतेला बसला होता. तो अनुभव लक्षात घेता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय राखला आहे. त्यामुळे संभाव्य धोका नसल्यचं शशिकला जोल्ले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

“युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न”

संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here