मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यात त्यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून नाहक त्रास दिला जातो, असं म्हटलं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रताप सरनाईक व त्यांचं कुटूंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून त्रास देतंय, त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं. प्रताप सरनाईक शिवसेनेच्या कुटूंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. आता यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
संज्याला ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील त्या दिवशी त्याला स्वतःची औकात कळेल. त्याच्या मागे पाच हक्काचे शिवसैनिक नाहीत. प्रामाणिक शिवसैनिक संज्याचा तिरस्कार करतो पण कसं तरी स्वतःला फार मोठा नेता दाखवण्याची संज्याची नेहमी धडपड असते, असं ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
संज्याला ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील त्या दिवशी त्याला स्वतःची औकात कळेल. त्याच्या मागे पाच हक्काचे शिवसैनिक नाहीत. प्रामाणिक शिवसैनिक संज्याचा तिरस्कार करतो पण कसं तरी स्वतःला फार मोठा नेता दाखवण्याची संज्याची नेहमी धडपड असते. https://t.co/o84YumjAmk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”
महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ
ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ खोत