आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं. मुंबईतील लिलावती रूग्णालयात शिरसाट यांना दाखल करण्यात आलं आहे. आता शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली आहे, अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जलील पारकर यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”
शिरसाटांना रुग्णालयात दाखल केलं असता, सर्वप्रथम त्यांना स्थिर करण्यात आलं. त्यांच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या आणि अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओग्राफी करत असताना त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी (ब्लॉकेज) आढळली आहे. डॉ.नितीन गोखले यांनी ही अँजिओग्राफी केली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीसजी, पत्रास कारण की…, मनसेचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र
महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय; ठाकरे गटाचा हल्लाबोल