नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

0
250

मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द केल्याप्रकरणी लोणावळ्यात 2 दिवसांची सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद भरवण्यात आली होती. यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक विधान केलं होतं.

वाघ आमचाच आहे आणि तो आमच्याच इशाऱ्याने चालतो, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यावर आता भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजलीये, त्यामुळे जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल”

पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे; बालेवाडीतील कार पार्किंगवरून निलेश राणेंचा हल्लाबोल

लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण- अमोल मिटकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here