आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रितिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याकामी पुढाकार घ्यावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. मागास वर्ग आयोगाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या सोयी-सुविधा पुरवा व तात्काळ डेटा गोळा करून ओबींसीचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
हे ही वाचा : “आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली”
केंद्र सरकारकडे असलेला डेटा जाणीवपूर्वक दिला गेला नाही. भाजप आणि केंद्र सरकारने राज्य सरकारची अडवणूक केली. मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार डेटा गोळा करण्याचे काम तात्काळ म्हणजे आजपासूनच सुरु केली पाहिजे. त्यासाठी जी काही संसाधने लागतील ती राज्य सरकारने पुरवली पाहिजेत. आता वेळ घालवणे योग्य नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
काँग्रेस पक्ष ओबीसींचे आरक्षण टिकावे यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा तात्काळ कामाला लावावी. जो वेळ जात आहे त्यापाठीमागे कोण आहेत? झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? याची माहिती आम्ही लवकरच उघड करु, असा इशाराही नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
OBC reservation: सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा झटका; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका
“मोठी बातमी! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण”