तुला थोबडवनार आता आम्ही मराठी; मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जानकुमार सानूला मनसेचा दणका

0
174

मुंबई : सध्या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मराठी भाषेची चीड येते असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत जानकुमार सानूला चांगलंच सुनावलं आहे.

जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला., असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं., असं अमेय खोपकर यांनी ट्विट करत जानकुमार सानूला चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

…तर खंबीर मराठा समाज सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

राशिद खानची शानदार बाॅलिंग; सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी विजय

उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे…; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here