“आता वर्ष उलटलं, 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल”

0
727

जळगाव : आता वर्ष उलटलं, अशीच 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या संवाद यात्रेसाठी एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये आढावा बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.

कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून काही गोष्ट कराव्या लागतात. कार्यकर्ते थांबवून ठेवण्यासाठी, अरे बाबा सरकार येणार आहे जाऊ नकोस, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे, हे सरकार पडणार आहे असं सांगण्याच प्रयत्न केला जात आहे., असं एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

एकीकडे आईचे आरोप तर.. दुसरीकडे मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल

अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?; आशिष शेलारांची टीका

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?; तृप्ती देसाईंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here