आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला

0
626

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता सोमय्यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका नेत्यावर निशाणा साधला आहे.

तुरुंगात जाण्याचा आता पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा उपरोधक सल्ला सोमय्या यांनी यावेळी दिला. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘हा’ मोठा नेता पुन्हा स्वगृही परतला”

आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक चिट्ठीत आपोआप अनिल परब यांचा आला आहे. अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आलं., असं सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

नवाज शरीफ, जीव वाचविण्यासाठी मोदींना लपून भेटले; इम्रान खान यांचा धक्कादायक आरोप

ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा भाजपला इशारा, म्हणाले…

“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याचा टीझर व्हायरल, बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब काॅपी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here