मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. तसेच आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Ab to Thackeray Sarkar ki Dadagiri Khatam Hogi. Anil Deshmukh should resign in #SushantSingRajput case @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/VRkyN5X0GD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
माझ्यासाठी प्रार्थना करा- संजय दत्त
शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; म्हणाले…
… ही दादांची स्टाईल असून ती मली भावते- अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया