आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अंधेरीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. यावर मनसेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असून याबाबत राज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्याचं ते ट्विट चर्चेत; म्हणाले, मुख्यमंत्री राज ठाकरे…
”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,अशी विनंती राज ठाकरे यांनी या पत्रात केली आहे. मी माझ्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असंही राज ठाकरे पत्रात म्हणाले.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे देणार भाजप उमेदवाराला पाठींबा?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?
नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
… मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार