“आता मंत्र्यांवर कोरोनाचं सावट; छगन भुजबळांनंतर आता शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

0
231

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. अशातच आता मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती.

भुजबळांनंतर आता शिंदे गटातील या मोठ्या नेत्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. शंभूराज देसाईंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो., असं शंभूराज देसाई यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य तर देवेंद्र फडणवीसच चालवतात; राष्ट्रवादीची टीका

संजय शिरसाट म्हणाले, एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन, आता सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here