आता कोरोनो गो नाही तर ‘महाविकास आघाडी गो’,असं म्हणावं लागेल- रामदास आठवले

0
632

मुंबई : कोरोना गो.. कोरोनो गो…. नंतर आता ‘महाविकास आघाडी गो’, असं म्हणावं लागेल, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीला इशारा देत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी यावेळी केली.

मी ‘कोरोना गो’ च्या घोषणा दिल्या म्हणून जास्त रूग्ण सापडले नाहीत. सगळ्या लोकांची जबाबदारी आहे की कोरोनापासून आपला बचाव कसा होईल. त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, कोरोना भारतातून हद्दपार व्हावा यासाठी मी ‘कोरोना गो-कोरोना गो’ अशी घोषणाबाजी केली होती. सध्या डॉक्टरांची टीम पूर्णपणे कोरोना भारतातून घालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझ्या घोषणेबाजीवर लोक टीका करत आहेत पण जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत आपण कोरोना गो म्हणत राहूया, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मी कोरोना गो’ म्हटल्यामुळे जास्त रूग्ण सापडले नाहीत”

“महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी”

मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

“शिमगा नुकताच संपल्यामुळे विरोधकांना कुठला मुहूर्त शिल्लक राहिलेला नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here