जळगाव : राज्यात आज रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. आजपासून 15 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्री घराबाहेर पडण्यावरही निर्बंध होते. तरी देखील कोरोनाची भीती न बाळगता बाहेर पडणारे नागरिक सर्रास अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. याचदरम्यान भुसावळमध्ये पोलिसांनी यावर नामी शक्कल लढवली आहे. जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार रात्रीच्या संचारबंदी वेळेमध्ये जे नागरिक रस्त्यावर बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांची त्याच ठिकाणी रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं यासंंबंधीचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचारबंदीच्या कालावधीमध्ये जे नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा; मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ प्रमुख मागण्या
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण”
ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल