मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आरक्षणाला घेऊन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून येतात. त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा. हे राजकारण नाही तर गचकरण झाले आहे. आता मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार, असं उदयनराजे म्हणाले. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची माणसं कोर्टात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकांशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो पण त्याचा उपयोग झाला नाही असंही उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…नाहीतर तुझं करिअर बरबाद करेन, अशी धमकी देत प्रशिक्षकानंच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार”
आयपीएल सुरू होण्याआधी RCB ला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूनं घेतली माघार
नागपूरमध्ये 21 मार्चपर्यंत कडक लाॅकडाऊन- नितीन राऊत
राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत चालेल- संजय राऊत