औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
आरक्षण नसलं तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाही. आज सरकारची मानसिकता दिसत नाही, त्यामुळे आम्ही आवाज उठवू. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणी पंकजा मुंडेंनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“फडणवीस खोटारडे, भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; आता चोराच्या उलट्या बोंबा”
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट
“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”