शरद पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

0
546

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. शिवसेना काँग्रेस विचाराची कदापि होऊ शकणार नाही, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. गीतेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

1998 मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तर काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहे, असं आठवले म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

नाशिक महापालिकेसाठी मनसेची जय्य्त तयारी; महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरेंचा ‘हा’ प्लान

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here