आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर आहे. पुण्याला मोठा ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. मात्र, पुण्याची ओळख म्हणजे फक्त शनिवारवाड्यापर्यंतच मर्यादीत राहिलेली दिसत असते. अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावरच्या शनिवार वाड्याच्या फोटोवरून प्रशासनावर टीका केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे ट्रोलिंग सुरू आहे.
पुणे विमानतळावर असलेल्या शनिवारवाडा तसंच पेशव्यांच्या चित्रांवर कोल्हे यांनी आक्षेप घेतला. पुणे विमानतळावरचे काही फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले. यात शनिवारवाडा तसेच पेशव्यांशी संबंधित काही दृश्य आहेत. या फोटोंवर डॉ. अमोल कोल्हेंनी आक्षेप घेतला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन
“पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगड देखील आहे आणि याच पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी देखील आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे विमानतळ प्रशासनाला विसर पडला की काय?, असा सवालही अमोल कोल्हेंनी केला आहे.
दरम्यान, कोल्हे यांनी केलेल्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्यांना प्रतिप्रश्न करत चांगलचं सुनावलं आहे. “छत्रपतींचा विसर कोणालाच पडू शकत नाही पण असे फोटो ट्विट करुन नवा वादच तयार करायचा असेल तर काय म्हणणार? आणि इतकाच खरंच पेशव्यांबदल आदर असेल तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे नामकरण करा म्हणावे पुणे एअरपोर्टचे” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर “आपण खासदार आहात, आपण प्रत्यक्ष कृती करू शकला असतात, ह्या प्रकारे समाजात तेढ निर्माण करू नये. महाराजांचा आदर्श समोर ठेवावा”, असं एका युजरने म्हटलं आहे.
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी.१/२ pic.twitter.com/eLOrOQ2497
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
रोहित पवारांना मिळणार मंत्रिपद?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“…तर भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या बाता कुणी करू नयेत”
अखेर कंगणाला माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी आणि…; पहा व्हिडिओ