शाळा आता नाही, पण…; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
157

मुंबई : सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विरोधकांवर आपले मत मांडले.

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवलं आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईच्या रस्त्यावर वडापाव लवकरच मिळेल, असं उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले.

शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरु होणार असं विचारा. मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच, परीक्षा व्हावी असं मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, तिस-या वर्षांच्या मुलांना सरासरी मार्क देऊन अडथळे दूर केले आहेत. सरासरी मार्क नको असलेल्यांना परीक्षेचाही पर्याय उपलब्ध आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“…तर आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये; शरद पवारांचा डॉक्टरांना इशारा”

…तेंव्हा सरकारने माझं ऐकलं नाही आणि; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

भाजपने पाठवली शरद पवारांना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली 1 हजार पत्रं

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here