मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ते शिवसेनेत नाराज असून, केवळ सही पुरतेच मंत्री असल्याचे राणे यांनी म्हटले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मोठा दावा केला आहे.
एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. त्यांना लाल दिवा आणि कॅबिनेटचा स्टाफ मिळतो, सुविधा मिळतात. पण रिमोट कंट्रोल दुसरीकडेच आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही-9 मराठीशी बोलत होते.
नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, कॅबिन स्टाफ मिळतो पण या मंत्रीमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“रावसाहेब दानवेंची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधान पदाचा अपमान”
नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार- यशोमती ठाकूर
माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; एकनाथ शिंदेंचे राणेंना प्रत्युत्तर
परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य