Home महाराष्ट्र “एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”

“एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”

मुंंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसंच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठवण्यात येऊ नये, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनामार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोव्हिड 19 लक्षणे नसलेल्या परंतु कोव्हिड 19  पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील कोव्हिड 19 रुग्णांची संख्या पाहता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत. कोणीही त्यापासून वंचित राहू नये तसेच करोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

… तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश राणे

मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही- देवंद्र फडणवीस

तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय…,अमिताभ बच्चन यांच भावूक ट्विट

अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; वयाच्या 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास