Home महाराष्ट्र मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची...

मातोश्रीकडे येण्याची कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही आता घरी जा; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना सूचना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले होते. पण राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याने मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.

हे ही वाचा : उद्या वाजता हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर जाणारच; राणा दाम्पत्याचा निर्धार

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. त्यानंतर पुन्हा वर्षा बंगल्याकडे जात असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केलं. मात्र त्यानंतरही शिवसैनिक मातोश्रीबाहेर ठाण मांडून बसले आहेत.

दरम्यान, तुम्ही कृपा करुन सगळ्यांनी घरी जा. इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही दिवसभर इथे आहात त्यामुळे घरी जा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना केलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा

मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर केली बॅनरबाजी

…म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला