Home महाराष्ट्र “जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”

“जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसकडून स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. यावर छोटे पवार तिथं कमी पडले, हे लक्षात आल्याने आता मोठे पवार पुण्याच्या मैदानात उतरले आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे .

जनतेसोबत पवार यांचे असणारे हे बॉण्डिंगच भाजपाच्या पोटात धडकी भरवणारे आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील, असं प्रदीप देशमुख म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “भाजपला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. अद्यापही सत्ता स्थिर आहे. त्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाल्याने सरकारविरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. शरद पवार आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात, असंही प्रदीप देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते त्या व्यक्तीला कुणीही गंभीरतेने  घेत नाही. चंद्रकांत पाटील यांचा राजकारणातील अनुभव चांगला असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलेंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही एक प्रकारची मनोरंजन सेवाच आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये, असा टोलाही प्रदीप देशमुखांनी  यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात- रामदास आठवले

“यंदाच्या दिवाळीला अमृता फडणवीस चाहत्यांना देणार एक सुरेल दिवाळी गिप्ट”

अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव