आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज ठाकरेंना कोण सिरियस घेत नाहीत. असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.
राज ठाकरे खट्याळपणे बोलतात. त्यांचा हा स्वभाव आहे. त्यांना सिरीयस घेत नाहीत, असं शिरसाट म्हणालेत.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांना धक्का; शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ‘हे’ मोठे नेते करणार घर वापसी?
राज ठाकरेंची भूमिका काय असावी हा त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी महायुती बरोबर राहावं हा आमचा आग्रह आहे. परंतु त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज राज ठाकरे पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुण्यात आलेल्या पुरावर भाष्य केलं आहे. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला.. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का? असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज ठाकरे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेत; ठाकरे गटाचा टोला
मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य