नागपूर : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा काल रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की, काँग्रेसने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असं म्हटलं होतं. मग आता काय झालंय, आम्ही तर बाजार समित्या बरखास्त करु असं म्हटलंही नाही. तर मग शेतकऱ्यांना भडकवून हे नेते काय साध्य करु पाहत आहेत, असा प्रश्न फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, काँग्रेसने 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचं उत्तर दिलं पाहिजे. 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे. यांना महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा चालतो मग केंद्राचा का नाही, ही ढोंगबाजी का? शेतकऱ्यांच्या या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही., असंही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट”
धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा”
“पुरंदर विमानतळ बारामतीला हलवण्याचा शरद पवारांचा डाव”