मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये; मनसेचा कंगणा रणाैतला इशारा

0
169

मुंबई : मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणाैतने केली होती. त्यावरून आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असंही अमेय खोपकर यांनी म्हणत कंगणा रणाैतला इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं- अतुल भातखळकर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली- कंगना रणौत

माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here