Home महाराष्ट्र शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला

शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या 4 दिवस विदर्भ दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना शरद पवारांनी पक्षाची ताकद वाढविण्याबाबत भाष्य केलं होतं.

हे ही वाचा : निलंबनाची कारवाई करून एसटी चालू करण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न- प्रवीण दरेकर

‘पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून कोण व्यक्ती पर्याय बनू शकते हे महत्त्वाचे नाही. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

ज्यांना कधी 10 खासदार निवडून आणता आले नाही ते 300 खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी 1 प्रश्न मार्गी लावलेला दाखवा?, असा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

‘ही विधानसभा शेवटची’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळं राजकीय खळबळ

“शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करावं”

“नाना पटोले यांनी पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”