आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ओळखले जातात. त्यांच्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण वृत्तीने ते अनेकदा विधानसभेत विरोधकांना धारेवर धरतात. मात्र हेच आक्रमक, निर्भिड फडणवीसांना कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे.
राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही. असं म्हणणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला घाबरतात, अशी कबुली दस्तुरखुद्द फडणवीसांनीच दिली.
हे ही वाचा : शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला सेनेचा भगवा
पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. तेंव्हा फडणवीसांनी स्मशानभूमीच्या उदघाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते, असं म्हणताना त्याचं कारण ही त्यांनी सांगून टाकलं.
मी नागपूरचा महापौर असताना, तेव्हाच्या विरोधीपक्ष नेत्यांच्या वॉर्डात गेलो होतो. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला. असं म्हणताच एकच हशा पिकला. पण सुदैवाने तुम्ही तसं काही केलं नाही. हे माझं नशीब म्हणायचं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“… त्यामुळे 2024 ला मोदीचं सत्तेत येणार आहेत”
पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात; सदाभाऊ खोत यांची टीका
“भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”