“2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”

0
622

नवी दिल्ली : 2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार, असं वक्तव्य हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी केलं.

भाजप-जजपा सरकारही 2024 पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, असं चाैटाला यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना 2024 ची वाट पाहावी लागणार नाही. मोदी सरकार लवकरच कोसळणार, असं भाकित चाैटाला यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन”

“…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतांचा जावईशोध; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here