मुंबई : दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिकी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
खरं तर अशा परिस्थितीत कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. त्यांना परवानगी देण्याची गरज नव्हती. महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण आपल्याकडे ती परवानगी नाकारण्यात आली. दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे परवानगी नाकारली असती तर टीव्हीवरुन वारंवार एखाद्या वर्गाला, समाजाच्या संबंधी एक चित्र मांडून सांप्रदायिक कलह वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, ती संधी मिळाली नसती, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सध्याच्या घडीला देशात 4076 करोनाच्या केसेस आहेत. तसंच 118 मृत्यू झाले आहेत. 328 रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“इस्लामपूरातील 25 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”
महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का? राम कदमांचा सवाल
महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागणार- राजेश टोपे
जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं; अजित पवारांच जनतेला आवाहन