Home देश “खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात”

“खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात”

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मी घरी क्वॉरंटाईन झालेलो आहे आणि सातत्याने दुखद बातम्या समजत आहेत. भारतात तयार झालेलं संकट हे कवेळ कोरोनामुळे आलेलं नाही, तर केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे आलेलं आहे. देशाला तुमचे खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, तर या प्रश्नांवर उपाययोजना हव्या आहेत, असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन”

गरीब जनता ही केवळ संख्या नाहीये. ते जीवंत माणसं आहेत. असे शेकडो नाडलेले कुटुंबं आहेत. भाजपचं सरकार मध्यवर्गाला पायाखाली तुडवून गरीब वर्गात ढकलत आहे. या प्रकारे भाजप सरकारने विनाश करुन दाखवलाय., असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तुम्ही उधार घ्या, चोरी करा पण रूग्णांना ऑक्सिजन द्या; दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक! रसल, पॅट कमिन्सच्या वादळी खेळीनंतरही कोलकाताचा 18 धावांनी पराभव

“उद्या रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू”