पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचा महापौर शिवसेचा असणार असा दावा केला होता. मात्र राष्ट्रवादीने संजय राऊतांचा हा दावा धुडकावून लावला आहे.
हे ही वाचा : “प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरेंना बोलवा, महाराष्ट्राला चांगला संदेश जाईल”
आगामी निवडणुका व त्यानंतर महापौरपदाबाबत कुणी काहीही दावे करीत असले तरी येत्या निवडणुकीनंतर पिंपरी तसेच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससचाच महापौर होईल, असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
कुणी कितीही दावे करत असले तरी, प्रत्येकाला आपापल्या पक्षाबद्दल बोलण्याचा आधिकार आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुणे व पिंपरीतील ताकद सर्वांना माहिती आहे. ही ताकद आगामी काळात आणखी वाढणार असल्याने या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा महापौर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही., असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपने आमचा विश्वासघात केला या मतावर मी आजही ठाम- महादेव जानकर
धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी उभा राहणार- महादेव जानकर