कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

0
446

मुंबई : कितीही ट्रोल करा. मी मराठी मुलगी आहे. मागे हटणार नाही. माझं काम करतच राहणार, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या बोलत होत्या.

उर्मिला मातोंडकरांनी या पत्रकार परिषदेत यावेळी धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व, काँग्रेस आणि भाजप आदी सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी ट्रोलरवरही टीका केली.

दरम्यान, अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोलिंग केलं जात आहे. मला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. पण ट्रोल केल्यामुळे मी योग्य रस्त्यावरून जात असल्याचं माझ्या लक्षात येतंय. मला कितीही ट्रोल केलं तरी मी मागे हटणार नाही. मी मराठी मुलगी आहे. मराठी पाऊल पुढे पडतच राहणार, असं म्हणत उर्मिला मातोंडकरांनी ट्रोलर करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत- दिपक केसरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले- उर्मिला मातोंडकर

“सांगलीतील भिलवडीमध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार”

मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू- उर्मिला मातोंडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here