“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही”

0
189

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्यावेळी महाराष्ट्रातील जनेतासाठी कोव्हिड काळात उपाययोजना कराव्या लागल्या, सेवासुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरु केलं, तेव्हा मला थोडी लाज वाटते की त्यावेळी भाजपच्या आमदारांचा फंड महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला. मुख्यमंत्री मदत निधी मला नको होतो, महाराष्ट्रासाठी हवा होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना जोरदार फटकारलं.

महाराष्ट्रात भाजप जी पोलखोल करत आहे ती पोलखोल नाहीच आहे. महाराष्ट्रात पोलला, निवडणुकीला वेळ आहे, पण केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशोब कोण मांडणार? कोण देणार? त्याचा हिशोब विचारायचा नाही का?, असे प्रश्न करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

केंद्राचा फंड तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. काय वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पूजा चव्हाणचा लॅपटाॅप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक गायब”

दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?- चित्रा वाघ

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरू पंकजा मुंडेंची टीका

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री; ‘नटसम्राट’वरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here