पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही., असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योगी आदित्यनाथांना टोला लगावला आहे. बारामती मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणल्या. योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती कळत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे”
“सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या”