Home महाराष्ट्र “अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं...

“अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं होतं”

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. त्यानुसार 11 वाजण्याच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहचायचं होतं. मात्र परब यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी, ईडीच्या चौकशीला हजर राहायला हवं होतं., असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहेत. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“परळीत धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच व्यासपीठावर दिसले; चर्चांना उधाण”

नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, त्यासाठी कामं करावी लागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य