Home पुणे “कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

“कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

पुणे : कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते शनिवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलत होते.

कोरोनाच्या संकटात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही. कोरोनाच्या काळात आम्ही सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये

राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला- रोहित पवार

देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…

“फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?”