बेळगाव : हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, असं म्हणत बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रातून समिती विरोधात प्रचाराला कोणी येणार नाही. कारण हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे., असं शुभम शेळक म्हणाले.
तुम्ही हे वाचलात का?
धोनीसेनेचा विजयारंभ! चेन्नईचा पंजाबवर 6 गडी राखून दणदणीत विजय
दरम्यान, काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे असं वाटत नाही. मुळात हा प्रश्न निर्माण केला काँग्रेसने आणि भाजपला या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हांला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून हसू नाही; पहा व्हिडीओ
“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका
ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही- विनायक राऊत