नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक आज पार पडली. त्यानंतर राज्यात सत्तेचा तिढा सुटणार असल्याची शक्यता होती. पण या बैठकीत सत्ता स्थापनेवर कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे
सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
आमच्यासमोर 6 महिन्याचा वेळ आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि देसाईंसोबतची चर्चा फक्त आमदार म्हणून केली. या बैठकीत फक्त काँग्रेस- राष्ट्रवादीबाबतच चर्चा झाली, असंही म्हणाले.
दरम्यान, एकीकडे बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पवारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाली असल्याची माहिती देण्याता आली आहे