Home पुणे पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सव मागच्या वेळीप्रमाणे यंदाही साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल, असं पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र सिसवे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनाबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच ‘श्रीं’ च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हांला नाही; रूपाली चाकणकरांचा टोला

…तर मग नारायण राणे हे महायेडे आहेत का?; गुलाबराव पाटील

“राणे कुटूंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये”