निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं; राष्ट्रवादीचं सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर

0
456

धुळे : भारताचा माजी क्रिकेटर व भारतरत्न सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिनला सल्ला दिला होता. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का?, सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असे प्रश्न करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. यावर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया देत सदाभाऊ खोतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

पवार साहेबांनी या वयात कुस्ती खेळणं यांना अपेक्षित आहे का?, आणि या निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं आहे. आपण ज्या नर्सरीत शिकता शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे, असं शेख म्हणाले. तसेच खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे. कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही, असं म्हणत शेख यांनी खोतांवर निशाणा साधला.

दरम्यान, सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत ते काहीही बोलू शकतात, असा टोलाही शेख यांनी यावेळीॊ लगावला.

महत्वाच्या घडामोडी

भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय- आशिष शेलार

“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात”

साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला- निलेश राणे

“कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here