मुंबई : राज्यातील वीज कंपन्यांवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय परस्पर घ्यायला नको होता. त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे होती, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सरकार तीन पक्षांचं असल्याने सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जावा. त्यामुळे आता जे झालंय त्याची दुरुस्ती केली जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
दरम्यान, तसेच महाविकासआघाडीत कोणतीही नाराजी नाही. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही, असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या घडामोडी-
व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही- उदयनराजे भोसले
दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला
तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपवर टीका
राष्ट्रवादी पाठवणार व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं