Home देश महाविकासआघाडीचं सरकार राज्यात टिकणार नाही- नितीन गडकरी

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात टिकणार नाही- नितीन गडकरी

नवी दिल्ली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकासआघाडी जवळपास निश्चित झाली आहे. पण हे सरकार बनण्याच्या आधीच पडणार, असं वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची आघाडी संधीसाधू आहे, सहा ते आठ महिन्यांपेक्षा जास्त हे सरकार टिकणार नाही, असं गडकरी म्हणाले आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहणं हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा मानला जातो, असही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित होती. त्यामुळे ही युती देशातली सगळ्यात जास्त काळ टिकली. आजही आमच्या विचारांमध्ये साम्य आहे. असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.